वादळी पावसामुळे शिर्डी विमानतळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिर्डी विमानतळावरील गोडावून गेल्या महिन्यातच आग लागली होती. यात मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. त्यानंतर मुंबई येथून आलेले विमान लॅन्डींग होत असताना धावपट्टी सोडून शेजारील मैदानात शंभर फुट अंतरावर गेले होते. या दोन्ही घटना ताज्या असताना वादळी पावसाचा पुन्हा एकदा फटका शिर्डी विमानतळाला बसला आहे. 

शुक्रवारी (दि. ८) सायंकाळच्या सुमारास अचानक जोराचे वादळ व पाऊस यांचे आगमन झाले. वाऱ्याचा वेग मोठा असल्याने अरायव्हलच्या बाजुची काचेची भिंत अक्षरश: पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे काही क्षणात कोसळली. काचांचा खच या ठिकाणी पडला. सुदैवाने या ठिकाणी प्रवाशी नसल्याने कोणी जखमी झाले नाही. 

Loading...
चार वाजेच्या सुमारास हैद्राबाद येथून साईभक्तांना घेऊन आलेल्या विमानास खराब वातावरणामुळे उतरण्यास एटीसीची परवानगी नाकारण्यात आल्याने हे विमान औरंगाबाद येथील विमानतळावर उतरविण्यासाठी वळविण्यात आले. मात्र, याठिकाणीही परवानगी नाकाराल्याने अखेर भक्तांना घेऊन आलेले विमान पुन्हा हैद्राबादला येथे नेण्यात आले. 

हैद्राबादला जाण्यासाठी ६५ प्रवासी विमान तळावर आले होते. परंतु, आलेले विमान न उतरताच परत गेल्याने या प्रवाशांचे तिकीटाचे पैसे परत देण्यात आले. विमानतळावरुन या भक्तांना शिर्डीत पोहोचविण्याची व्यवस्था विमानतळ प्रशासनाने केली. आलेले वादळ इतक्या जोराचे होते की, अहमदावरुन आलेले एक खासगी विमान विमानतळाच्या पार्किंगमध्ये उभे होते. या विमानाची दिशा बदलून गेली. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.