नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देत विधवा महिलेवर अत्याचार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नोकरी देण्याचा बहाणा करून तसेच नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देऊन एका विधवा महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन संस्था चालकाने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे. 

पिडीतेने दिलेल्या तक्रारीवरून अशोकलाल रतनलाल शहा यास पोलिसांनी अटक केली आहे. त्यास न्यायालयासमोर उभे केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.Loading...
पुणे येथील एका संस्थेचे बेलापूर येथे वसतीगृह असून येथे काम करणाऱ्या महिलेस नोकरी देण्याच्या अमिषाने तसेच त्यानंतर नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी देऊन संस्थेच्या सचिवाने अत्याचार केला. पीडित महिलेच्या तक्रारीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला भा. दं. वि. कलम ३७६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.