के.के.रेंज युध्द सरावादरम्यान पारनेर तालुक्‍यातील सुतारवाडीत तोफगोळे पडले


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर तालुक्‍यातील सुतारवाडी येथे के.के. रेंज येथून मिलीटरी सरावादरम्यान उडालेला तोफगोळा पडला. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार घडकीस आला असून सुतारवाडी शाळा व घरांपासून अगदी शंभर फुट अंतरावर रस्त्यावरच हा तोफगोळा पडल्याने ग्रामस्थांमध्ये भीती पसरली.

Loading...
माजी सरपंच बबन पवार यांनी घटनेची माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांना कळवली. त्यांनी प्रांताधिकारी यांच्याशी संपर्क साधून त्यांना याविषयी माहिती दिली. प्रांताधिकाऱ्यांनी नगर येथील बॉम्ब शोधकपथक, पारनेर पोलीस ठाण्याचेपथक व मिलिटरीच्या पथकामार्फत या ठिकाणाची पाहणी केली.बॉंम्बशोधक पथकातील टीमसह श्‍वानपथक, पारनेरचे पोलीस यांनी तोफगोळा शोधला.

ढवळपुरी परिसरातील सुतारवाडी, हेमलाचा तांडा, लमाणतांडा ते पळशी, वनकुट्यापर्यंचा भाग के.के. रेंजच्या पट्ट्यात जोडण्याचा प्रयत्न संरक्षण विभागाकडून सुरु होता. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मध्यस्थीने केंद्रीय संरक्षण मंत्र्यांपर्यंत हा प्रश्‍न मांडण्यात आला. यानंतर हा भाग रेंजच्या क्षेत्रातून वगळण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.