वाळू काढण्यावरून वाळू तस्करांमध्ये धुमश्चक्री !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अकोले तालुक्यातील देवठाण येथील आढळा नदीमध्ये वाळू काढण्यावरून दोन वाळू तस्करांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली. महसूलच्या अधिकाऱ्यांनी दोघांना चांगलीच तंबी भरल्यानंतर या वादावर पडदा पडला. 

याबाबत सविस्तर असे कि, मंगळवारी रात्री अकोले शहरातून बड्या वाळू तस्करांचे डंपर आढळा नदी पात्रात वाळू भरण्यासाठी आले होते. त्यास गावातील एका वाळू तस्कराने विरोध केला. गावातील नदीतील वाळू गावातील लोकांना मिळाली पाहिजे. शिवाय भरदिवसा वाळू उपसा करण्यास महसूलने मागेल त्याला परवाना दिला पाहिजे, असे विरोध करणाऱ्या स्थानिक वाळू व्यावसायिकाचे म्हणणे होते.

Loading...
वाळू भरण्यावरून दोन्ही तस्करांमध्ये बाचाबाची झाली व भांडण झाले. दरम्यानच्या काळात महसूलच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना माहिती मिळाली. त्यामुळे अकोलेहून महसूल कर्मचारी देवठाण गावी येण्याच्या आत डंपर काढून घेण्यात आले व सदरचे भरलेले डंपर लंपास केले.मग नेहमीप्रमाणे महसूल अधिकारी आले, पण त्यांना काही हाती लागले नाही.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.