फसवणूक केल्याने सरपंचांवर कारवाईचे आदेश


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- खिर्डी गणेश ग्रामपंचायतीच्या सरपंच सरला सोपान चांदर यांनी त्यांच्यावरील फौजदारी गुन्ह्याची माहिती निवडणुक लढविताना उमेदवारी अर्जात दडवुन ठेवत शासनाची फसवणुक केली म्हणून राज्य निवडणुक आयोगाने याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी, अहमदनगर यांना दिले आहेत. 

त्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी २५ मे रोजी अध्यादेश क्रमांक १३४५ नुसार कोपरगावचे तहसिलदार किशोर कदम यांना कारवाई करण्याचे आदेश जारी केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी सविस्तर माहिती अशी की, खिर्डी गणेश ग्रामपंचायतीची निवडणुक २०१७ मध्ये पार पडली. त्यात उमेदवारी अर्ज भरताना सरला चांदर यांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या फौजदारी गुन्ह्याची तपशिलवार माहिती लिहली नाही.

Loading...
त्याबाबत प्रतिस्पर्धी उमेदवार नंदा जनार्दन रोहोम व खिर्डी गणेशच्या ग्रामस्थांनी छाननीच्यावेळी आवश्यक ते सर्व कागदपत्र सादर करून सरला चांदर यांचा उमेदवारी अर्ज बाद करावा म्हणून मागणी केली होती. मात्र त्यावेळी काही कारवाई न झाल्याने सरपंचपदाच्या निवडणुकीत सरला चांदर विजयी झाल्या.

त्याच्या विरूध्द नंदा रोहोम यांनी राज्य निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे शपथपत्रात खोटी व अपूर्ण माहिती दिल्याची तक्रार दाखल करून त्यांचे सरपंचपद रद्द करून फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली होती.

याप्रकरणी निवडणुक आयोगाने हे प्रकरण तपासासाठी पाठविले. कोपरगाव पोलिस स्टेशन व तहसिलदार यांनी या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल कावि ग्राप-३६ दिनांक २२ मे २०१८ रोजी निवडणुक आयोग व जिल्हाधिकाऱ्यांना दिला.

त्याची सुनावणी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्यासमोर होवुन राज्य निवडणुक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्याकडील ११ ऑगस्ट २००५ व २०फेब्रुवारी २०१३ रोजीच्या परिपत्रकानुसार सरला चांदर यांनी प्रतिज्ञापत्रातील गुन्हेगारीबाबतची माहिती चुकीची व खोटी दिली म्हणून विनाविलंब त्यांच्यावर कारवाई करावी म्हणून आदेश पारीत केले.या आदेशाच्या प्रती तहसिलदार कोपरगाव व पोलीस ठाणे कोपरगाव यांना देण्यात आल्या आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.