दोन ट्रकची समोरासमोर धडक,भीषण अपघातात दोन ठार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नागपूर- मुंबई महामार्गावर संवत्सर शिवारात मुंबईहून औरंगाबादकडे व औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दोन ट्रकची समोरासमोर धडक झाली. एका ट्रकचे चालक व क्लिनर असे दोन जण ठार झाले आहेत. तर दुसऱ्या ट्रकचा चालक जखमी झाला. 

शुक्रवारी हा भीषण अपघात झाला.अन्वर गौस खान (वय ४१, रा. बौजीपुरा, जि. औरंगाबाद ), आमेरखान लिकायत खान (वय २४, रा. कागजीपुरा, ता खुलताबाद) अशी अपघातात ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकमधील चालक रजनी प्रेमात सोनी किरकोळ जखमी झाला आहे. त्याला कोपरगाव साईद्वारका अ‍ॅक्सीडेंट (नाईकवाडे) हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

Loading...
अपघाताची भीषणता इतकी होती की दोन्ही ट्रकचा समोरचा भाग चक्काचूर झाला होता. घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली. अपघातातील दोन्‍ही मयतांचे शव विच्‍छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रूग्‍णालयात दाखल केले आहे. एकाच ट्रकमधील दोन जण ठार झाल्‍याने उशीरापयंर्त त्‍यांची माहिती व नावे मिळु शकली नव्‍हती.


----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.