श्रीरामपुरात ज्वेलरीचे दुकान फोडले,३० हजाराचा माल लंपास.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीरामपूर शहरातील मेनरोडवरील रमेश मार्केटमधील पौर्णिमा शॉपी, इमिटेशन ज्वेलरी या दुकानाचा छताचा पत्रा अज्ञात चोरट्याने उचकटून शॉपीतील किमती सेंट, पावडर, क्रीम, ज्वेलरी, बांगड्या आदी सुमारे ३० हजाराचा माल चोरुन नेला आहे. 


पौर्णिमा एजन्सीचे चालक राजेंद्र पवार व त्यांचा मुलगा बबलू पवार हे मंगळवारी रात्री ८.३० वाजता दुकान बंद करुन गेल्यानंतर बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गोल्ड मार्केटच्या बाजुने दुकानाच्या छतावरून पत्रा उचकटून आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील सी.सी.टि.व्ही. कॅमेऱ्याच्या वायर तोडून चोरी केली.

Loading...
पवार सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानातील सामान चोरुन नेल्याचे निदर्शनास आले. पवार यांनी चोरीप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली असता निरीक्षक संपत शिंदे व गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पाहणी केली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.