कोपरगावात टँकर-दुचाकीच्या अपघातात विद्यार्थिनी जागीच ठार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर-मनमाड महामार्गावरील येवला नाका येथे टँकर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाला असून चुलते गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि.७ जून ) सकाळी १०.१५ वाजताच्या सुमारास घडली. 

या घटनेतील आफ्रिन आजमेर पठाण (२०, रा. समता नगर, कोपरगाव ) असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे. तर हुरखा बुढणखा पठाण (४० रा.शारदानगर, कोपरगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत.. मिळालेल्या माहितीनुसार, आफ्रिन ही डि.एड.ला शिक्षण घेत होती.काल हुरखा आणि आफ्रिन हे दोघे आपल्या दुचाकीवरुन पेपर देण्यासाठी नगर - मनमाड महामार्गाने बाभळेश्वर येथे जाण्यासाठी निघाले होते.

Loading...
त्यांची दुचाकी येवला नाका परिसरात आली असता त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगात येणारा टँकरने (क्र. एचआर.६१ सी. ९२७७) दुचाकीला जोरदार धडक दिली. यात हुरखा आणि आफ्रिन दोघे रस्त्यावर पडले. दरम्यान, टँकर आफ्रिनच्या अंगावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

तिचा मृतदेह कोपरगाव ग्रामिण रुग्णालयात नेण्यात आला. तर हुरखा हे गंभीर जखमी असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमजद हसन शेख यांनी यांनी टँकर चालकाविरोधात फिर्याद दाखल केली असून कोपरगाव शहर पोलिसांनी टँकर चालक पुष्करसिंग लक्ष्मणसिंग मोहरा (२५, रा. उत्तराखंड ) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.