अहिल्यादेवींच्या जयंती कार्यक्रमातील गोंधळास पालकमंत्री राम शिंदेच जबाबदार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- चोंडी येथे झालेल्या अहिल्यादेवींच्या जयंतीत निरपराध लोकांवर पालकमंत्री ना. राम शिंदे यांनी जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल करून अडकवले आहे. या सर्व घटनेला राम शिंदेच जबाबदार असल्याचा आरोप धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष व उस्मानाबाद जिल्हा परिषद सदस्य सुरेश भाऊ कांबळे यांनी केला आहे. 

जामखेड येथे अटकेत असलेल्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी धनगर नगर आरक्षण कृती समितीचे सुरेश कांबळे ,पांडुरंग मेरगळ, बाळासाहेब कोळेकर, विलास देवकाते, ॲड.ज.ब.गावडे, डॅा.शिवाजी देवकाते, संजय खरात रासपा चे तालुकाध्यक्ष विकास मसाळ आदींसह कार्यकर्ते आले होते.

यावेळी सुरेश देवकाते यांनी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांची भेट घेऊन पोलीस कोठडीतील असुविधेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कांबळे म्हणाले,अहिल्यादेवींच्या जयंतीच्या कार्यक्रमात आरक्षणाचा अधिकार मागताना पोलिसांनी ३०७, ३५३ गंभीर गुन्हे दाखल करून कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबले.

Loading...
या सर्वांवरील गुन्हे माघे घेण्याची मागणी केली.या सर्व घटनेला पालकमंत्री ना. शिंदेच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. सोमवारी पुणे येथे धनगर समाजाची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून, या बैठकीमध्ये राज्यभरातील धनगर समाजाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.