वाळूतस्करांकडून श्रीगोंदे पंचायत समितीच्या वाहनचालकास मारहाण


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :तहसीलदार महेंद्र माळी व त्यांच्या पथकाने अवैध वाळूतस्करीविरुद्ध कारवाई करीत वाहने पकडली, याचा राग धरून तीन अज्ञात इसमांनी पंचायत समितीचे वाहनचालक बाळासाहेब डोईफोडे यांना शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेचा तहसील व पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून गुरुवारी निषेध केला.

याबाबत सविस्तर असे की, नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सुरू असल्याने पंचायत समितीचे वाहन क्र. एम. एच. 16 एन 461 हे सध्या तहसीलदार महेंद्र माळी वापरत आहेत. गेल्या दोन दिवसांत तहसीलदार व त्यांच्या पथकाने दाणेवाडी, निमगाव खलू व पेडगाव शिवारात कारवाई करून काही अवैध वाळूवाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली.
Loading...

या पथकात बाळासाहेब डोईफोडेदेखील सहभागी होते. बुधवारी रात्री डोईफोडे श्रीगोंद्यावरून पिंपळगाव पिसा येथे दुचाकीवरून आपल्या घरी चालले होते. या वेळी तीन अज्ञात इसमांनी अडवून “तू आमची गाडी पकडून दिल्याने आम्हाला आता 2-3 लाख रुपये दंड होईल,’ असे म्हणत शिवीगाळ करीत मारहाण केली.
या घटनेचा तहसील व पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून निषेध व्यक्‍त केला. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.