खबरी असल्याच्या संशयातून दोघांना बेदम मारहाण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेवगाव तालुक्यात वाळूतस्करीचा धंदा जोरदारपणे सुरू असून, वाळू तस्करी करणाऱ्या वाहनांची माहिती प्रांत कार्यालयाला कळवतो, असा संशय घेऊन तीन जणांनी दोन जणांना बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील भगूर येथे घडली.

याबाबत प्रसाद म्हसू गरुड राहणार भगूर. शेवगाव याने पोलिसात फिर्याद दिली. तो फिर्यादीत म्हणतो, आपण दि. 5 रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास पाथर्डी रस्त्यावरील हॉटेल सिद्धार्थच्यासमोर उभे राहिलो होतो. त्यावेळी अब्दुल कलीम शेख, फिरदोस कलीम शेख व फिरोज कलीम शेख सर्व राहणार भगूर हे तेथे आले.

त्यांनी प्रसाद गरुड व त्याच्या समवेत असणारा सचिन बबन जायभाये या दोघांनी तुम्ही आमच्या वाळूच्या वाहनांची माहिती प्रांताधिकाऱ्यांना देता का असे म्हणत शिवीगाळ करत लाथाबुक्‍यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत गरुड यांच्या पायाला गंभीर जखम झाली.

Loading...
त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येवू नये म्हणून शेवगाव व परिसरात वाळूतस्करी करणाऱ्या व्यक्तींनी फिर्यादीवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला.

शेवगाव शहरासह तालुक्‍यात विविध गावात असणाऱ्या नदीपात्रातून वाळूचा उपसा मोठ्या प्रमाणात होत असून महसूल व पोलीस प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने पर्यावरणाचा मात्र मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. आजची एवढी गंभीर घटना घडली असतानाही पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने वाळूतस्कर व पोलिसांची मिलीभगत आहे काय असाही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.