नारायण राणेंनी घेतली छगन भुजबळांची भेट


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :छगन भुजबळ तुरुंगातून बाहेर आल्यानंतर विविध राजकीय नेते त्यांची भेट घेत आहेत. यात आता नारायण राणे यांची भर पडली आहे. नारायण राणे यांनी आज वांद्रे येथील एमईटी संस्थेत छगन भुजबळ यांची भेट घेतली.

दरम्यान, राणे आणि भुजबळ यांच्यामध्ये साधारण अर्धा तास चर्चा झाली. भुजबळ तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राणे पहिल्यांदाच भेटले आहेत. भुजबळ आणि राणे यांच्या भेटीमुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 


Loading...
दोघांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली ते अद्याप गुलदस्त्यात आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गिरीश महाजन, शरद यादव यांनी भुजबळांची भेट घेतली होती.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.