आ.संग्राम जगताप यांना नव्हता गंभीर आजार, डॉक्टरांनी दिला अहवाल !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- खुनाच्या गुन्ह्याचा आरोप असलेल्या आमदार संग्राम जगताप यांना कोणताच गंभीर आजार नसल्याचे दिव्य मराठीने केलेल्या तपासात उघड झाले आहे. घाटीच्या दोन विभागप्रमुखांनी गंभीर आजार नसल्याचा अहवाल दिला होता. 


असे असतानाही त्यांची १६ दिवस बडदास्त ठेवली होती. दिव्य मराठीने याबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्यांची रवानगी हर्सूल कारागृहात करण्यात आली हाेती.आ. जगताप १८ मे रोजी अस्वस्थ वाटत असल्याचे सांगत घाटीत दाखल झाले होते. ते तब्बल १६ दिवस व्हीआयपी उपचार घेत होते. 

Loading...
त्यांची बडदास्त ठेवण्यासाठी घाटीतील विशिष्ट डॉक्टरांना या कामासाठी जुंपण्यात आले होते. जगताप यांना विभागप्रमुखांकडे रेफर केल्यानंतर त्यांच्यावर किमान तीन दिवस उपचार करायचे असे वरिष्ठांकडून सांगण्यात येत होते. दरम्यान, वरिष्ठांचे आदेश दोन प्राध्यापक डॉक्टरांनी नाकारले. जगताप यांना कोणताच गंभीर आजार नसल्याचा अभिप्राय त्यांनी दिला.

या डॉक्टरांनी दिला अहवाल : सर्जरी विभागाच्या प्रमुख डॉ. सरोजिनी जाधव यांच्याकडे जगताप यांना पोटाचा प्रचंड त्रास होत असल्याने पाठवण्यात आले होते. डॉ. सरोजिनी यांनी जगताप यांच्यावर प्राथमिक उपचार करून आजाराबाबत शहानिशा केली. 

तेव्हा गंभीर काहीच आढळले नाही. काही गोळ्या घेतल्यानंतर ते ठीक होतील, असा अभिप्राय दिला. त्यानंतर डॉ. एस. एस. बीडकर यांच्याकडे त्यांना किडनीच्या बाजूला गाठ असल्याचा रिपोर्ट देऊन उपचारासाठी पाठवण्यात आले. 

डॉ. बीडकर यांनी जगताप यांना तपासून शस्त्रक्रिया करण्याची गरज नसल्याचे सांगत औषध देऊन सुटी द्यावी असे सांगितले. पुन्हा लूज मोशन आणि उलटीचे कारण पुढे करून डॉ. उद्धव खरे यांनी जगताप यांच्यावर चार दिवस उपचार केले.

दिव्य मराठीच्या हाती आले रिपोर्ट
जगताप यांनी केएफटी (किडनी फंक्शन टेस्ट) केली होती. यात त्यांच्या किडनीभोवती गाठ असल्याचे निदान या रिपोर्टमध्ये करण्यात आले आहे. मात्र कोणत्या किडनीजवळ गाठ आहे याचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे आजाराचे निदान होणार तरी कसे, असा प्रश्न डॉक्टर उपस्थित करत १६ दिवस वाट पाहत होते. जगताप यांची बायोप्सी करून त्यांची सर्जरी करण्याचा निर्णय घेणे आवश्यक होते. मात्र तसे काहीच झाले नाही.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.