विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्‍हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपरगावात विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती, सासु- सासरे,नणंद - नंदाई यांच्या विरोधात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. 

Loading...
पतीसह सासरच्‍या माणसांनी घर बांधण्यासाठी माहेराहुन पैसे आणावेत अशी मागणी करुन पती, सासरा, सासू नणंद व नंदाई यांनी वेळोवेळी मला मारहाण केली.तसेच  मुलगा सार्थक याला येथे ठेवून माहेरी चालती हो म्‍हणुन आपला शाररीक, मानसिक छळ करून मला लाथ्थाबुक्‍कयांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद विवाहिता प्रियंका अजय पंडोरे, वय-२४ हिने दिली आहे.

पती अजय उध्दव पंडोरे, सासु रोहीणी उध्दव पंडोरे, सासरे उध्दव पोपटराव पंडोरे, नणंद कोमल अमोल साबळे व नंदाई अमोल नामदेव साबळे या पाच जणांविरोधात कोपरगाव शहर पोलीसांत दिली आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.