धनगर कृती समितीचे तहसीलसमोरील उपोषण अखेर मागे.अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात ५१ समाजबांधवांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. हे गुन्हे मागे घ्यावेत, म्हणून धनगर कृती समितीने तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर बुधवारी उपोषण मागे घेण्यात आले. 

चोंडीत ३१ मे रोजी पालकमंत्री राम शिंदे यांच्या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमात धनगर आरक्षणाबाबत घोषणाबाजी केल्याप्रकरणी दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी धनगर आरक्षण कृती समितीने उपोषण सुरू केले होते. ३०७, ३५३ यासारखे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.

Loading...
दोषी नसणाऱ्या अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये अनेक विद्यार्थी असून त्यांचा भवितव्याची चिंता निर्माण झाली आहे. शासनाने कोणतीही शहानिशा न करता खोट्या गुन्ह्यात अडकवले आहे, असे सांगत धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष विकास मासाळ, संजय खरात, गणेश सूळ, अक्षय भोगे, संदीप हुलगुंडे, आकाश शिंदे, मोहन देवकाते, हनुमंत शिरगिरे, धनराज तागड, आशिष मासाळ, कैलास शिरगिरे आदी कार्यकर्ते उपोषणास बसले होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.