निळवंडे प्रकल्पाला केंद्राकडून निधी मिळण्याचा मार्ग मोकळा - राधाकृष्ण विखे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :निळवंडे प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाच्या तांत्रिक सल्लागार समितीने मान्यता दिली. हा प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या योग्य आणि व्यवहार्य असल्याचा अभिप्राय समितीने दिल्याने धरणासाठी केंद्र सरकारच्या योजनेचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. 

याबाबत विखे यांनी दोनच दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करून निळवंड्यासाठी तांत्रिक समितीची मान्यता द्यावी, अशी विनंती केली होती. केंद्रीय जलसंपदा विभागाचे सचिव सिंग यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत झालेल्या बैठकीत निळवंडे प्रकल्पाला समितीची मान्यता मिळवण्यात यश आले.


Loading...
केंद्राच्या निधीसाठी आवश्यक विविध विभागांचे ना-हरकत दाखले पाठपुरावा करून आपण मिळवले, असे सांगून विखे म्हणाले, केंद्र सरकारच्या निधीसाठी राज्य वित्त समितीची आवश्यक असलेली शिफारस मिळावी, म्हणून राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा लागला.

राज्य वित्त समितीची शिफारस काही दिवसांपूर्वी मिळाली. आता तांत्रिक सल्लागार समितीनेही सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्याने या प्रकल्पाला निती आयोगाची मान्यता मिळण्यातील सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. निती आयोगाच्या मान्यतेनंतर निळवंडे कालव्यांसाठी केंद्राच्या बळीराजा कृषी जलसिंचन योजनेतून निधी उपलब्ध होईल.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.