रायगडावर चेंगराचेंगरी, दगड अंगावर पडल्याने एक शिवप्रेमी ठार,सात जण जखमी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानंतर गड उतरत असताना झालेल्या चेंगराचेंगरीत आणि त्यातच डोंगरावरून आलेल्या दगडाने एक शिवप्रेमी ठार तर सात जण जखमी झाले आहेत. गड उतरत असतांना महा दरवाजा जवळ अरुंद वाटेमुळे गर्दी आटोक्यात न आल्याने ही घटना घडली.


Loading...
रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याला प्रचंड गर्दी उसळली होती. लाखोंच्या संख्येने शिवप्रेमीं गडावर आलेले होते. या सर्वानाच रोपवेची सुविधा न मिळाल्याने अनेकांनी गड पायी चढउतार केला. दुपारी हा सोहळा आटपून शिवप्रेमी गड उतरत होते.

गर्दी इतकी होती की पाउलवाटा आणि पायऱ्यांवरुन उतरणही अवघड झाले.चित्त दरवाजा ते हत्ती तलाव पर्यंत शिवप्रेमीची रांग दिसत होती. शिवराज्याभिषेकदिन सोहळा सुरू असताना पायी येणाऱ्यांची गर्दी आणि गड उतरणाऱ्याची गर्दी यामुळे अरुंद पायवाट आणि पायऱ्या यामुळे खुबलढा बुरुज, महादरवाजा, याठिकाणी चेंगराचेंगरी होण्याचा घटना घडल्या. 

याच दरम्यान महादरवाजा ते खुबलढा बुरुज परिसरात डोंगरावरून आलेल्या दगडाने एकाचा प्राण घेतला. अशोक उंबरे (वय 19,रा.उळूप, ता. भूम, जिल्हा उस्मानाबाद )असं या मयत शिवप्रेमीचे नाव आहे.

त्याच्या सोबत चालत असलेल्यांपैकी मंदा मोरे ( वय 45 रा. सोलापूर, सोनाली गुरव (वय 30 रा.सातारा), अमोल मोरे (वय 23 रा.हडपसर), रामदेव महादेव चाळके (वय 39), अभिजित फडतरे (वय 23 सातारा), निलेश फुटवळ ( वय 35) अमित महांगरे (वय 24 रा.खेड शिवापूर) हे जखमी झाले आहेत. या जखमींना पाचाड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.