सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करणाऱ्यावर गुन्हे !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा येथे असणाऱ्या मोकळ्या जागेत राष्ट्रीय किसान महासंघ व किसान क्रांती जन आंदोलन यांच्या वतीने सरकारचा निषेध म्हणून सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन मंगळवार ५ जून रोजी करण्यात आले. याप्रकरणी ४२ जणांविरुद्ध घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
Loading...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील आंबीखालसा फाटा लगत असणाऱ्या मोकळ्या जागेत राष्ट्रीय किसान महासंघ व किसान क्रांती जन आंदोलन यांच्या वतीने सरकारचा निषेध म्हणून सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करताना दिसून आले. 

त्यामुळे याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल किशोर लाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी तब्बल ४२ जणांवर मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१),(३) चे आदेशाचे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.