राहुरीत विद्युत वाहक तारेला चिकटून महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महाविद्यालयीन विद्यार्थी गणेश अरूण गाढवे (वय १८) याचा सोमवारी दुपारी उसाच्या शेतातील तुटलेल्या विद्युत वाहक तारेचा शॉक बसून दुर्दैवी मृत्यू झाला. महावितरणच्या हलगर्जीपणाचा हा बळी असल्याच्या तीव्र भावना गाढवे कुटुंबिय आणि संतप्त ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. 

सोमवारी झालेल्या दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मंगळवारी सकाळी महावितरण कार्यकारी अभियंता शरद बंड, उपकार्यकारी अभियंता प्रदीप बेहरकर, कनिष्ट अभियंता टेकाळे, वायरमन लोळगे, गोसावी आले होते. 

Loading...
यावेळी मयत गणेशचे वडील, चुलते, नातेवाईक तसेच सरपंच बी.आर.खुळे, सदस्य विलास आढाव, माजी अध्यक्ष तंटामुक्ती कारभारी खुळे, बाळासाहेब कार्ले, भाऊराव आढाव, दादासाहेब कुलट आदींनी घटनेला महावितरणच जबाबदार असल्याचे सांगितले. 

तीन -चार महिन्यापूर्वीच याच भागातील विद्युत पोल वाकल्यामुळे व तारेचे झोळ शेतात पडून तीन ते चार शेतकऱ्यांचे ऊस पिके जळाली होती.तेव्हाच वळण ग्रामपंचायत पदाधिकारी, सोसायटी पदाधिकारी आणि अनेक शेतकरी ग्रामस्थ यांनी देवळाली प्रवरा येथे महावितरणच्या उपविभागीय कार्यालयास मागणीचे निवेदन दिले होते. 

तेव्हा संबंधीत उपअभियंता यांनी दोन ते तीन महिन्यात सर्व दुरूस्तीचे आश्वासन दिले होते. पण पाच महिने होत आले तरी अद्याप दुरूस्ती केलेली नाही. . दुरूस्ती वेळीच केली असती तर गणेशचा बळी गेला नसता, अशा भावना व्यक्त होत आहे.

----------------------------

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.

--------------------------------

Powered by Blogger.