धकधक गर्ल माधुरी दीक्षितला भाजपकडून राज्यसभेची ऑफर !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :धकधक गर्ल माधुरी दीक्षितला भाजपकडून राज्यसभेची ऑफर देण्यात आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज संपर्क फॉर समर्थन या अभियानातंर्गत माधुरी दीक्षितची घरी जाऊन भेट घेतली.

त्यानंतर या चर्चेला उधाण आलं आहे. मात्र, अशा प्रकारच्या कुठल्याही ऑफरचा इन्कार भाजपकडून करण्यात आला आहे.दुपारी एकच्या सुमारास अमित शाह माधुरी दीक्षितच्या घरी पोहोचले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विनोद तावडे, भाजपचे सरचिटणीस अनिल जैन यांची उपस्थिती होती.
Loading...

माधुरीच्या घरी पती श्रीराम नेने आणि मुलगाही उपस्थित होता.संपर्क फॉर समर्थन या अभियाना अंतर्गत यापूर्वी अमित शाहांनी कपिल देव यांचीही भेट घेतली होती. तर आज ते रतन टाटा यांचीही भेट घेणार आहे.त्यानंतर ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर जाणार आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.