शिर्डीतील बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिर्डीलगत असलेल्या निमगाव-कोऱ्हाळे गावातील महिला शोभा रमेश पोपळघट (वय ४५) ही महिला ३० मे रोजी घरातून बेपत्ता झाल्याची मिसींग शिर्डी पोलिसात महिलेचा मुलगा सुनील रमेश पोपळघट याने दिली होती. 

बेपत्ता महिलेचा शिर्डी पोलीस तपास करीत असताना बाह्यवळण रस्त्यालगत असलेल्या निमगाव येथील लताबाई कुदळ यांच्या मालकीच्या विहिरीत या महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

Loading...
ही महिला घरातून जाताना 'मी पाणी घेऊन येते' असे सांगून बाहेर पडली होती. ती गेल्यानंतर पोपळघट कुटुंबाने गावात व नातेवाईकांत शोधाशोध केली. महिलेचा मृतदेहच आढळून आल्याने शिर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून मृतदेहाची ओळख पटवून पोलिसांनी तो नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.