डाक सेवकांचा खा.गांधी यांच्या कार्यालया समोर घंटा व थाळीनाद आंदोलन.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :ग्रामीण डाक सेवकांना खात्यात समाऊन घेवून, सातवा वेतन आयोग व कमलेशचंद्र कमिटीच्या शिफारशी लागू करण्याच्या मागणीसाठी चालू असलेल्या बेमुदत संपाच्या पंधराव्या दिवशी अखिल भारतीय ग्रामिण डाक सेवक संघटना अहमदनगर शाखेच्या वतीने खा.दिलीप गांधी यांच्या कार्यालया समोर घंटा व थाळीनाद आंदोलन करण्यात आले. 

केंद्र सरकार ग्रामीण डाक सेवकांच्या प्रश्‍नाकडे लक्ष देत नसल्याने सरकारला जाग आनण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. सदर मागण्या मान्य न झाल्यास आक्रमक पवित्रा घेत मुख्य डाक कार्यालयाचे गेटबंद आंदोलन करुन, इमारतीवरुन उड्या टाकून आत्महत्या करण्याचा इशारा ग्रामीण डाक सेवकांनी दिला आहे.

Loading...
या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष आनंद पवार, सचिव एन.बी. जहागीरदार, अशोक बंडगर, भिमराज गिरमकर, लक्ष्मण बर्डे, सुर्यकांत श्रीमंदीलकर, सलिम शेख, संतोष औचरे, दिलीप मेटे, विजय एरंडे, दत्तात्रय कोकाटे, बी.डी. ढोकळे, रशीद सय्यद, चंद्रकांत पंडित, गौतम गवते, कैलास माने, आर.आर. गवते, सिध्देश्‍वर घोडके, पी.आर. तनपुरे आदिंसह जिल्ह्यातील ग्रामीण डाक सेवक सहभागी झाले होते.

केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आलेला आहे. डाक विभागाचे कामकाज केंद्र सरकारमार्फत चालून देखाल ग्रामीण डाक सेवकांना अद्याप सातव्या वेतन आयोगाची तरतूद करण्यात आलेली नाही. सदरील मागण्यांसाठी ग्रामीण डाक सेवकांनी वेळोवेळी आंदोलने केली.

मात्र मागण्या मान्य होत नसल्याने ग्रामीण डाक सेवकांनी मंगळवार दि.22 मे पासून देशव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. संपाचा पंधरावा दिवस उलटून देखील केंद्र शासन दखल घेत नसल्याने शासनाला जाग करण्यासाठी घंटा व थाळी नाद आंदोलन करण्यात आले. ग्रामीण डाक कर्मचारी संपावर असल्याने ग्रामीण भागातील पोस्टाचा व्यवहार व कामकाज पुर्णत: कोलमडले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.