जामखेडमध्ये पाण्याच्या टाकीत आढळला तरूणाचा मृतदेह.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जामखेड शहरातील बसस्थानक परिसरातील पाण्याच्या टाकीत ईस्माईल उस्मान सय्यद (३८, सदाफुले वस्ती) या तरूणाचा मृतदेह मंगळवारी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ईस्माईल मोलमजुरी किंवा बसस्थानकात चणे-फुटाणे विकून उदरनिर्वाह करत होता. ३ जूनपासून तो बेपत्ता होता. बसस्थानक परिसरातील नवीन दवाखान्याच्या बांधकामावर त्याची चप्पल व कपडे आढळले. ईस्माईलच्या पत्नीला संशय आल्याने ती कपडे सापडले तेथे शोध घेत होती.

Loading...
दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे बांधकामावरील टाकी पाण्याने भरली होती. एका टाकीत रक्ताळलेले पाणी पाहून नातेवाईकांना संशय आला. इंजिन लावून टाकीतील पाणी काढले असता इस्माईलचा मृतदेह दिसला. नागरिकांच्या मदतीने तो बाहेर काढण्यात आला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.