कोतवाली पोलिस ठाण्याच्या आवारात पोलिसांसमोरच हाणामारी !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोतवाली पोलिस ठाण्याच्या आवारात पहाटेच्या सुमारास काही तरुणांनी येऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करून हाणामारी केली. पोलिसांसमक्ष हा प्रकार घडल्याने पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून त्यांचे विरुद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे. 

मंगळवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास काही तरुण कोतवाली पोलिस ठाण्याच्या आवारात आले. तेथे त्यांच्यातच काहीतरी कारणावरून वाद झाल्याने मोठमोठ्याने आरडाओरडा करून एकमेकांची गचांडी पकडून हाणामारी करू लागले.

Loading...
यावेळी ड्युटीवर असलेले ठाणे अंमलदार पो. ना. गर्जे, पोहेकॉ. भांबरकर, मुळे, पोकॉ. बोरूडे, पोकॉ. जाधव, महिला पोलिस कर्मचारी वर्षा कदम, पोना. नितीन उगलमुगले यांनी घटनास्थळी येऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले.

त्यामध्ये संतोष कल्याण गायकवाड (रा. आनंदनगर, रेल्वे स्टेशन, अ. नगर), मयुर दत्तात्रय शिंदे (रा. गुजर गल्ली, शनिचौक, अ. नगर), प्रसाद साहेबराव चौधरी (रा. वडगाव बुद्रुक, पुणे) आणि अमोल दिलीप सुरसे (रा. रोहकले गल्ली, नालेगाव, अ. नगर) यांचा समावेश आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.