महापौर सुरेखा कदम यांची खा.गांधी व बोराटे यांचा नामोल्लेख टाळत टीका.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- वादग्रस्त ठरलेल्या अमृत योजनेतील भुयारी गटारी व मलनिस्सारण प्रकल्पाच्या १२९ कोटी रुपयांच्या निविदेला राज्यस्तरीय समितीने मंजुरी दिल्याची माहिती महापौर सुरेखा कदम यांनी दिली. या योजनेत खोडा घालणाऱ्यांवर महापौरांनी यावेळी टिका केली.महापौर यांच्या टिकेचे लक्ष्य खासदार दिलीप गांधी व विरोधी पक्षनेता बाळासाहेब बोराटे हे होते. 

स्थायी समितीच्या बैठकीत २६ एप्रिलला चर्चा न करता या भुयारी गटारच्या निवेदस मंजुरी देण्यात आली होती. अमृतच्या भुयारी गटार निविदा मंजुरीचा आर्थिक व धोरणात्मक विषय असताना स्थायी समितीची सभा पाच मिनिटात गुंडाळण्यात आली होती. 

Loading...
प्रस्तावात मुख्य लेखा अधिकाऱ्यांचा अभिप्राय नाही. जादा तीन कोटी रक्कम मनपा कशातून उभी करणार, याचाही तपशील नव्हता. सभेच्या दिवशी रात्री साडेआठ वाजता मनपा कार्यालयात कर्मचारी बसवून सभेत जी चर्चा झाली नाही, ते ठरावात नमूद करून प्रशासनाकडे पाठविण्यात आल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. 

ही निविदा मंजुरीचा ठराव बेकायदेशीर आणि आर्थिक नुकसान करणारा असल्याने तो विखंडित करावा, अशी तक्रार विरोधी पक्षनेता बाळासाहेब बोराटे, मुदस्सर शेख, संजय लोंढे, कलावती शेळके यांनी नगर विकास खात्याकडे केली होती. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया वादात आली होती.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.