राहुरीत वेश्या व्यवसायावर छापा,हॉटेल मालकासह चार महिलांना अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे एका हॉटेलवर अनेक वर्षांपासून बेकायदेशीररीत्या सुरु असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकण्यात आला. राहुरी आणि नगरच्या संयुक्त पोलीस पथकाने ही कारवाई केली. छाप्यामध्ये हॉटेल मालक व अन्य ४ जण तसेच ४ बंगाली महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

यामध्ये हॉटेल मालक वसंत रघुनाथ लोंढे, रा. कोल्हार खुर्द तसेच अविनाश धनराज माकोने, रा. गोंधवणी, श्रीरामपूर, सुनील भाऊसाहेब सिनारे, रा. तांभेरे, प्रमोद विलास गुंजाळ, रा.वांबोरी, संदीप प्रभाकर मंडलिक, रा. चिंचोली, ता. राहुरी याखेरीज ४ बंगाली महिलांना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Loading...
गेल्या कित्येक दिवसांपासून कोल्हार खुर्द येथील हॉटेल न्यू प्रसाद येथे हा अवैध कुंटणखाना सुरु होता. यापूर्वीही येथे छापा टाकून कारवाई करण्यात आली मात्र स्थिती पूर्ववत सुरु राहिली. सोमवारी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास या हॉटेलवर पोलिसांनी अचानक छापा टाकला.

नगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष कलवाणीया यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर रोकडे, जाधव तसेच नगरच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर रोकडे यांनी दिलेल्या फियार्दीत म्हटल्याप्रमाणे, याठिकाणी वसंत लोंढे याने स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी पिडीत महिलांच्या असाह्यतेचा फायदा घेऊन पुरुष ग्राहकांशी संबध ठेवण्यास भाग पाडून कुंटणखाना चालविला. यासंदर्भात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.