जामखेड-करमाळा रस्त्यावर एसटी-दुचाकी अपघातात एक ठार

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जामखेड- करमाळा रोडवरील धोंडपारगाव जवळ एसटी बस व मोटारसायकलच्या अपघातात मोटारसायकल वरील युवराज पंढरीनाथ धुमाळ (वय ४८) यांचा जागीच मृत्यू झाला तर महारुद्र कल्याण शिंदे. हे गंभीर जखमी झाले आहेत.


अपघातानंतर संतप्त जमावाने एसटी बसवर दगडफेक करून बसच्या काचा फोडल्या. मयत महाराज युवराज पंढरीनाथ धुमाळ हे आपले सहकारी महारुद्र कल्याण शिंदे यांच्यासह जामखेडहून एम. एच. १६ बी. एल.- ४७३३ या मोटारसायकलने दुपारी दोनच्या सुमारास धोंडपारगावला चालले होते. 


Loading...
याचवेळी (एम. एच १२ ई एफ ६७०७) या करमाळा - जामखेड बसचा धोंडपारगावजवळ अपघात झाला. या मध्ये मोटारसायकलवरील महाराज युवराज पंढरीनाथ धुमाळ, (रा. धोंडपारगाव, जामखेड) यांचा जागीच मृत्यू झाला तर महारुद्र कल्याण शिंदे हे गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर संतप्त जमावाने जामखेड करमाळा रोडवरील वाहने अडवून अपघात घडलेल्या एसटी बसवर दगडफेक करून बसच्या काचा फोडल्या. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 

घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी व लियाकत शेख यांनी घटनास्थळी येऊन युवराज धुमाळ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणला. अपघातानंतर एसटी चालक घटनास्थळाहून फरार झाला. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.