पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बनतोय सिनेमा!


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सध्या बायोपिक सिनेमे मोठ्या प्रमाणात बनवण्यात येत आहेत. प्रेक्षकांकडूनही बायोपिक सिनेमाला चांगलीच पसंती मिळत आहे. संजय दत्तच्या जीवनावरच्या 'संजू'ची चर्चा आहेच. पण आता आणखी चर्चा आहे ती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरच्या बायोपिकची. 

मोदींची भूमिका परेश रावल साकारणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसापासून होत होती, ही चर्चा खरी असल्याचे आत्ता परेश रावल यांच्याकडूनच जाहीर झाले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर या सिनेमाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत हे खरे असल्याचे मान्य केले आहे.


Loading...
एक चहा विक्रेता ते देशाचे पंतप्रधान 
नरेंद्र मोदींच्या जीवनावर आधारीत असलेल्या या सिनेमाच्या लिखाणाला ते गुजरात राज्याचे मुख्यमंत्री असतानाच सुरुवात करण्यात आली होती. आता ते देशाचे पंतप्रधान झाल्यामुळे कथेत बदल करावा लागणार आहे. यामुळे सिनेमाला उशीर झाला आहे. आधी या सिनेमाची कथा एक चहा विक्रेता ते राज्याचे मुख्यमंत्री अशी असणार होता. पण आता ते पंतप्रधान झाल्यामुळे एक चहा विक्रेता ते देशाचे पंतप्रधान अशा स्वरूपाची असणार आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.