श्रीगोंदा तालुक्यातील कौठ्यात घरफोडी,६० हजारांचा मुद्देमाल लंपास.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालूक्यातील कौठा येथे सोमवार दि.४ रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरांनी घरात शिरून तब्बल ६० हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात प्रल्हाद साळुंके यांनी फिर्याद दाखल केली आहे.


प्रल्हाद परशुराम साळुंके वय ५९ या ठिकाणी आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. दि ३ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उकाड्यामुळे घराची कडी लावून, ते घराच्या समोरील ओट्यावर कुटुंबासह झोपले. सोमवार दि.४ जूनच्या रात्री पहाटे साधारण साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांची पत्नी पद्मिनी यांच्या गळ्यातील दागिने चोरांनी हिसकावल्याने त्या चोर चोर असे मोठ्याने ओरडल्या.

यावेळी घरातील मंडळी जागी झाली. त्यावेळी त्यांना त्यांचे घर उघडे दिसले. त्यानंतर त्यांनी घरात जावून पहिले असता देवघरातील सामानाची उचकापाचक झालेली दिसली. त्यात त्याच्या पत्नीने डब्यात ठेवलेले दागिने व पैसे चोरीला गेल्याचे त्याच्या लक्षात आले.त्यामध्ये एकूण ५ हजार रूपये रोख आणि ५५ हजार रुपयाचे सोने असा एकूण तब्बल ६० हजार रुपयाचा मुद्देमाल चोरांनी लंपास केला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.