खोटे गुन्हे मागे घ्या, अन्यथा बुधवारपासून चौंडी मध्ये उपोषण

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त समाजबांधवांवर जे खोटे गुन्हे दाखल केले आहेत. ते मागे घेण्यात यावेत. यासाठी धनगर समाज अन्याय निवारण समिती व विविध संघटनांच्यावतीने सहा जून रोजी चौंडी येथे आमरण उपोषण करून आत्मक्लेश करण्यात येणार आहे. असे निवेदन जामखेडच्या तहसीलदारांना दिले आहे.


या पत्रकात म्हटले आहे, ३१ मे रोजी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या समाजबांधवांवर ३०७, ३५३ व अन्य गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. यातील अनेकांवर दोषी नसतांना गुन्हा दाखल केला आहे.

त्यामुळे त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यात अनेक शालेय विद्यार्थी आहेत. पोलीस प्रशासनाने कुठल्याही प्रकारची शहनिशा न करता गुन्हे दाखल केले आहेत.याबाबत विचार करून गुन्हे मागे घेण्यात यावे. अन्यथा सहा जून रोजी चौंडी उपोषण करण्यात येणार आहे. असे निवेदन दिले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.