जिल्हा परिषदेत विस्थापित शिक्षकांच ठिय्या आंदोलन.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- बदल्यांमधील अनियमिततेमुळे तब्बल ६२० शिक्षकांना विस्थापित व्हावे लागले आहे. त्यामुळे खोटी कागदपत्रे व माहिती देणाऱ्या नियमबाह्य बदलीसाठी अर्ज करणाऱ्या त्या शिक्षकांवर कारवाई करावी. आणि त्यांची झालेली बदली रद्द करावी. या मागणीसाठी विस्थापित झालेल्या शिक्षकांनी सोमवार दि.४ रोजी जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन केले. 

या बाबतचे निवेदन जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा शिक्षण समितीच्या सभापती राजश्री घुले यांना दिले. या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, शासनाच्या २७ / २ / २०१७ च्या बदली धोरण निर्णयानुसार अहमदनगर जिल्ह्यात प्रथमिक शिक्षक, शिक्षिकांची बदली प्रक्रिया राबवली गेली. 

या बदली प्रक्रियेत संवर्ग १ व २ या बदली सुविधेचा बहुतांश शिक्षकांनी चुकीची, खोटी कागदपत्रे व माहिती सादर करून चुकीच्या पध्दतीने शासनाची दिशाभूल केली. व बदलीचा लाभ घेतला आहे. त्यामुळे या बदली प्रक्रियेत अनेक शिक्षक, शिक्षिका या विस्थापित झाले आहेत. 

या शिक्षकांमुळे त्यांच्यावर अन्याय झाला असून, अर्जातील शाळा मिळण्याची संधी गेली व अर्जातील शाळा न मिळाल्याने गैरसोयही झाली आहे.त्यामुळे बदली प्रक्रियेत संवर्ग १ व २ या सुविधेचा खोटी व चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे लाभ घेतलेल्या सर्व शिक्षकांची त्वरित चौकशी करावी, व ते दोषी आढळणाऱ्या शिक्षकांवर प्रशासकीय कारवाई करावी. 

तसेच त्यांना बदलीने मिळालेल्या शाळा रिक्त दाखवून विस्थापित झालेल्या शिक्षक, शिक्षिकांना द्याव्यात. तोपर्यंत विस्थापित शिक्षकांना बदली आदेश देण्यात येवू नयेत. तसे आदेश दिल्यास विस्थापित शिक्षक बदली धोरणाविरोधात उपोषण, मोर्चा यासारखे आंदोलन करतील. तसेच या प्रकाराबाबत न्यायालयात जाण्याचाही इशारा या निवेदनात दिला आहे. 


----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.