आर्थिक विवंचनेतून नगर शहरातील डॉक्टरची आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर शहरातील मार्केट परिसरात असणाऱ्या फाटके हॉस्पिटल येथे डॉ. महेश राऊत यांनी आत्महत्या केली आहे.त्यांच्याजवळ एक चिठ्ठी आढळून आली असून त्यामध्ये त्यांनी आपण आर्थिक कारणांमुळे आत्महत्या करत आहोत, असे चिठ्ठीत लिहले आहे. 

आज सकाळी  ही धक्कादायक घटना उघडकीस आली.डॉ. महेश राऊत यांनी इंजेक्शन घेऊन हॉस्पिटलमध्येच आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. फाटके हॉस्पिटल येथे आज सकाळी दवाखान्यातील कर्मचारी साफसफाई करण्यासाठी गेला असता त्याला दार बंद असल्याचे आढळले. म्हणून त्याने जोरजोरात दार वाजवले. दार उघडले नाही म्हणून त्याने जोरदार मारा केला व आत प्रवेश केल्यावर त्याला डॉक्टरांचा मृतदेह आढळून आला. त्याने या घटनेची माहिती अन्य डॉक्टरांनी दिली व त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.