गोपीनाथराव मुंडे यांचा संघर्षाचा वारसा मरेपर्यंत सांभाळणार - धनंजय मुंडे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :गोपीनाथराव मुंडे यांनी सर्वसामान्य जनतेसाठी संघर्ष केला. तोच वारसा मरेपर्यंत सांभाळणार असल्याची ग्वाही विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली.येथील लोकनेते मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने गोपीनाथ मुंडे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.

मुंडे म्हणाले की, स्व. गोपीनाथ मुंडे गेले यावर अजून विश्वास बसत नाही. गावापासून ते दिल्लीपर्यंतचा प्रवास संघर्षमय आहे. ते गेल्यावर देखील जनमाणसात त्यांचे स्थान आहे. आज मला मुंडे घरातील रक्ताचे समजलात याबद्दल आभारी आहे. मुंडे काय होते ते दाखवून देईल.ते राजकारणा पलीकडचे नेते होते म्हणून ते लोकनेते झाले.

मुंडे म्हणाले, मला सहा वर्षे खलनायक ठरवण्यात आले. याबद्दल दुःख वाटते. पण मी सामान्य माणसासाठी जीवन वेचत असेल तर खलनायक कसा, असा प्रश्‍न त्यांनी केला. ज्यांच्या संघर्षात वीस वर्षे सावलीसारखा बरोबर राहिलो. त्यांच्या मनात काय आहे ते मी ओळखत होतो.

मला मनातील भावना कधीच व्यक्‍त करता आल्या नाहीत. 1994 साली संघर्षयात्रा सामान्यांच्या प्रश्‍नांवर काढली. 95 साली त्याच्यामुळेच सरकार आले. लोकनेते मुंडें बरोबर असणारे आज सत्ता भोगत आहेत. आज आपण महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथींना जातीत बांधू नका, असेही ते म्हणाले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
------------------------------
Loading...
Powered by Blogger.