आमदार संग्राम जगताप पुन्हा रुग्णालयात दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव हत्यांकाड प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना पुन्हा घाटी रुग्णालयाच्या मेडिसीन विभागात दाखल करण्यात आहे. 

एप्रिल महिन्यात केडगाव उपनगरातील भररस्त्यात शिवसेनेच्या संजय कोतकर, वसंत ठुबे या पदाधिकाऱ्यांची गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली.प्रकरणात जगताप यांच्यासह १० जण कोठडीत आहेत.

सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले आमदार जगताप यांना २१ मे रोजी घाटी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारानंतर त्यांना दोन जूनला वॉर्ड दोन मधून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर तासाभरातच त्यांना पुन्हा पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याने त्यांना पुन्हा दाखल करण्यात आले आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.