श्रीपाद छिंदम म्हणतो मी उपमहापौर पदाचा राजीनामा दिलाच नाही !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदम ने उपमहापौर पदाचा राजीनामा दिलाच नाही असा खुलासा नगरविकास विभागाकडे केला आहे.

मी स्वतःची स्वाक्षरी असलेला उपमहापौर पदाचा कोणताही राजीनामा महापौर व महापालिका आयुक्‍तांकडे दिलेला नाही. ज्या तारखेचा राजीनामा दाखविण्यात आला आहे, त्यावेळी मी कोठडीत असल्याने असा कोणताही राजीनामा मी करुन देणे शक्य नव्हते.

महापौर कदम यांनी माझ्या लेटरहेडचा गैरवापर करुन, राजकीय षडयंत्र करुन माझी बनावट सही असलेला उपमहापौर पदाचा राजीनामा तयार करुन मंजूर करण्याचा गुन्हा केलेला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई अपेक्षित आहे, असा खुलासा श्रीपाद छिंदमने नगरविकास विभागाकडे केला आहे.

Loading...

अहमदनगर महानगरपालिकेचा पदच्युत उपमहापौर श्रीपाद छिंदमने महापालिकेच्या कर्मचाऱ्याला दूरध्वनी वरून शिवजयंती आणि शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याची ध्वनी फीत मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर त्याचे संतप्त पडसाद संबध महाराष्ट्रात उमटले होते. सर्व पक्ष व शिवप्रेमी संघटनांनी छिंदमचा निषेध केला होता .

शिवप्रेमींच्या रेट्यामुळे छिंदमला मिडीयावर चित्रफितीद्वारे माफी मागावी लागली.लोकक्षोभ शांत करण्यासाठी भाजपच्या काही नेत्यांना त्यांचा राजीनामा घ्यावा लागला. त्यांची पक्षातून हकालपट्टी करून अटक देखील करावी लागली.


दरम्यान महापालिकेत महासभेने नगरसेवक पद रद्द करण्याचा एकमताने ठराव मंजूर करत तो शासनाकडे पाठविला होता. शासनाने 14 मे रोजी श्रीपाद छिंदमला नोटीस बजावून म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले होते. 

नोटिसीला उत्तर देतांना छिंदम याने नगरसेवक पद रद्द करण्याच्या ठरावाला आक्षेप घेत उपमहापौर पदाचा राजीनामाच दिलेला नसल्याचा दावा केला आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.