महिलेस बंदुकीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महिलेस घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी पाच जणांविरुद्ध तोफखाना पोसिल ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


याबाबत सविस्तर माहिती अशी की, अंकिता सुनील डापसे (वय २३, रा. मुर्शदपूर फाटा, धारणगाव रोड, कोपरगाव, ह. मु. वंजारगल्ली, नगर) ही महिला व तीची आई घरी असताना दिपाली अर्जुन डापसे (वय ३०, रा. वंजारगल्ली, नगर), कांचन अर्जुन डापसे (वय २९, रा. वंजारगल्ली, नगर), श्रीकांत सोनवणे (रा. मोरवाडी, नाशिक), भुषण डापसे (रा. मोरवाडी, नाशिक), निलेश बोडके (रा. नाशिक) यांनी शुक्रवार दि. १ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास वंजारगल्ली येथील घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच शिवीगाळ व दमदाटी केली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.