सिद्धार्थनगर परिसरात जुगार अड्डयावर छापा.अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सिद्धार्थनगर परिसरातील एका प्लॉटमधील खोलीत सुरु असलेल्या जुगार अड्डयावर सहायक पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या पथकाने छापा टाकून ८ जणांना ताब्यात घेतले आहे. यावेळी रोख रक्कम, मोबाईलसह ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सहायक पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत सिद्धार्थनगर परिसरात जुगार अड्डा सुरु आहे. त्यानुसार डॉ. शिंदे यांनी पथकासह शनिवारी रात्री (दि.२) ८ वाजता छापा टाकून तेथून ८ जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून सात मोबाईल व रोख रक्कम असा जवळपास ५० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोकॉ. अभिजीत आरकल यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.