नगर-कल्याण महामार्गावर कार उलटून तिघे ठार,चाैघे गंभीर जखमीअहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर-कल्याण महामार्गावर पिंपळगाव जोगाजवळ वॅगन आर कार उलटून तीनजण ठार झाले, तर चाैघे गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी पहाटे चार वाजता झाला. 

अपघातात चालक अविनाश शंकर बनपटे (३२ वर्षे, वडारीचाळ, हनुमान मंदिर, कुर्ला पश्चिम, मुंबई), सुभाबाई हनुमंत गायकवाड (८० वर्षे), नेहा यल्लापा आरोटे (१२ वर्षे, दोघीही जयशंकर चौक, कुर्ला पश्चिम, मुंबई) हे तिघे ठार झाले. यल्लापा शांताराम आरोटे (३५), आशा यल्लपा आरोटे (३३), रोशनी यल्लपा आरोटे (१४), भूमिका यल्लपा आरोटे (१०) हे चौघे गंभीर जखमी झाले.

आरोटे कुटुंब नगरहून कल्याणकडे जात असताना पहाटे पिंपळगाव जोगा कामगार वसाहतीजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या विरुध्द बाजूला उलटली.जखमींवर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपास ओतूर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक सूरज बनसोडे करत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.