कार्यकर्ते आणता येत नसतील तर घरी बसा - अजित पवार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पक्षाच्या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांना आणणे ही पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. अनेक पदाधिकारी फक्त पदे घेऊन काम करतात, तर काही जण पदे घेऊनही काम करीत नाहीत. त्यामुळे अशांनी राजीनामे द्यावेत, असे खडेबोल माजी उपमुख्यमंंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या होमपीचवर पदाधिकाऱ्यांना सुनावले.

Loading...
बारामती तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार पवार यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा चांगलाच समाचार घेतला. 

या वेळी पवार म्हणाले, सरकार सर्वच घटकांना न्याय देण्यास अपयशी ठरल्याने आम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून गेल्या वर्षीपासून संघर्षयात्रा सुरू केली. आघाडी सरकारने ज्याप्रमाणे ७२ हजार कोटींची कर्जमाफी केली होती, तशी कर्जमाफी व्हावी, यासाठी हे आंदोलन सुरू केले. 

दि. १० जून रोजी पुण्यात होणाऱ्या हल्लाबोल आंदोलनाला पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पवार यांनी या वेळी केले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.