संगमनेर मध्ये कारच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील कोल्हार-घोटी राज्य महामार्गावरील नगर रोडवरील वसंत लॉन्ससमोर भरधाव वेगाने जाणाऱ्या एका स्विफ्ट कारने मोटारसायकलला समोरुन जोराची धडक दिल्याने मोटारसायकलस्वार ठार झाला असून एक जण जखमी झाल्याची घटना शनिवार दि.२ जून रोजी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास घडली. 

दानिश शफी सय्यद (वय २२, रा. जमजम कॉलनी, संगमनेर) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. . याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दानिश सय्यद व त्याचा मित्र तौफिक कादरी हे दोघे मोटारसायकल क्रमांक एमएच १७ एएच २२६१ हिच्यावरुन शनिवारी रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास समनापूरहून संगमनेरकडे येत होते.

हे दोघे कोल्हार-घोटी महामार्गावरील वसंत लॉन्स समोर आले असता त्याचवेळी संगमनेरकडून लोणीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी स्विफ्ट कारने मोटारसायकलला समोरुन जोराची धडक दिली. या अपघातात दानिश सय्यद व तौफिक कादरी हे दोघेही जखमी झाले.

या दोघांना औषधोपचारासाठी संगमनेर येथील खासगी रुग्णालयात नेले असता उपचारापुर्वीच दानिश सय्यद याचा मृत्यू झाला. तर तौफिक कादरी याच्यावर उपचार सुरु आहेत. घटनास्थळावरुन कारचालक फरार झाला. याप्रकरणी शहर पोलिसांनी कार चालका विरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.