दोन कुटुंबात वाद, कुऱ्हाडीने मारहाण करत जिवे मारण्याचा प्रयत्न


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर तालुक्यातील मेहेकरी शिवारात दोन कुटुंबात वाद होवून शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी तसेच कुऱ्हाडीने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून यामध्ये चौघे जण जखमी झाले आहेत. 


याबाबत सविस्तर माहिती अशी की, पहिल्या घटनेत सतिष महादेव वणवे (वय ३९, रा. मेहेकरी, ता. नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, लिंबाचे व शिवणीचे झाड तोडल्याच्या कारणावरून भाऊ सुभाष यास राजेंद्र अर्जुन आव्हाड, बाळु अर्जुन आव्हाड, अर्जुन रतन आव्हाड (सर्व रा. महालदरा वस्ती, मेहेकरी) यांनी डोक्यात कुऱ्हाडीने मारून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

 तसेच मुलगा युवराज व सुभाष वणवे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी करत जखमी केले. या घटनेत सतिष वणवेंसह दोघे जण जखमी असून या प्रकरणी तिघा जणांविरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.