नगर शहरात' बिबट्या' ची एंन्ट्री.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :ग्रामीण भागात आढळणारे बिबटे आता थेट नगर शहरात मानवी वस्तीत संचार करू लागले आहेत.

बिबट्याने आता थेट नगर शहरात 'एंट्री' केली असून सावेडी परिसरातील बोरूडे मळ्यात 'बिबट्याने' नागरिकांना दर्शन दिल्याने सर्वत्र घबराटीचे वातावरण पसरले असून नागरिकांत एकच खळबळ उडाली आहे.

वनविभागाच्या रक्षकांनी बोरूडे मळा परिसरात फिरून बिबट्याचा माग काढला पण त्याचा थांगपत्ता लागाला नाही,त्यांना पावलांचे ठसे आढळले. 

हे ठसे बिबट्याचेच असल्याचे लक्षात आल्यानंतर याच परिसरात दोन ठिकाणी 'पिंजरे' लावले आहेत. मात्र अद्याप बिबट्या पिंजऱ्यात आलेला नाही. बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. या परिसरातील एका कुत्र्यावरही बिबट्याने हल्ला केल्याचे सांगितले जात आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.