विजय मल्ल्यावर आधारित चित्रपटात गोविंदा मुख्य भूमिकेत!


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-बँकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून परदेशात पसार झालेला उद्योगपती विजय मल्ल्याच्या आयुष्यावर लवकरच चित्रपट येत आहे. पहलाज निहलानी यांनी 'रंगीला राजा' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली असून गोविंदा यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

'रंगीला राजा' या चित्रपटात मल्ल्याने केलेल्या आंतरराष्ट्रीय घोटाळ्यांवर प्रकाशझोत टाकला जाण्याची शक्यता आहे. चित्रपट पूर्णपणे मनोरंजक असेल, अशी ग्वाही निहलानी यांनी दिली आहे.पहलाज निहलानी हे सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष आहेत. रंगीला राजाच्या निमित्ताने गोविंदाला पुनरागमनाची नामी संधी मिळू शकते. ऑगस्टमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.