ज्यांना शुन्यातून राजकारणात आणले त्यांनीच दगाबाजी केली - सुजित झावरे


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राजकारणात संधीसाधू लोकांचा सुळसुळाट झाला आहे. राजकारण करताना पक्ष व ज्येष्ठांविषयी निष्ठा बाळगूण समाजकारण करणे गरजेचे आहे. परंतु पारनेरमध्ये काहींना शुन्यातून एका पदावर नेऊन बसवले, अशांनी दगाबाजी केली.त्यांच्या रक्तातच निष्ठा असावी लागते, अशी खरमरीत टीका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी भाळवणी गणातील एका  'उद्योग'पतीवर केली आहे. 

पारनेर तालुक्यातील जामगाव येथे आयोजित शेतकरी संप व राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब माळी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात झावरे बोलत होते. कार्यक्रमाला ५ हजार कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 

यावेळी झावरे म्हणाले, राजकारणात ज्यांना संधी दिली त्यांनी धोका दिला असून तो त्यांचा दोष नाही तर कौटुंबिक रक्तातच दोष आहे. अशा धोकाबाजांना जनताच धडा शिकवेल, असेही ते आवर्जून म्हणाले.यावेळी शेतकरी संपाला पाठिंबा दर्शविण्यात आला. ८० तरुणांनी रक्तदान केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी जाणता राजा प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.सदस्या सुप्रियाताई झावरे होत्या. कार्यक्रमाला पारनेरच्या नगराध्यक्षा वर्षा नगरे, मृत्यूंजय ग्रूपचे नितीन शेळके, गणेश काळे, सागर भिंगारदिवे, राष्ट्रवादीच्या सुदामती कवाद, गंगाराम बेलकर, भूमिपुत्रचे अनिल देठे, जाणता राजा प्रतिष्ठानचे सचिन वराळ, अ.भा.सेनेचे कविता पाराळे, शिरुर नगरसेवक विनोद भालेराव, गोरेश्वर पतसंस्थेचे चेअरमन बाजीराव पानमंद, श्रीपाद जगताप, जामगावच्या उपसरपंच सुनिताताई शिंदे, पुष्पाताई माळी, भीमा लामखडे, संतोष बर्डे, सोनवणे सर, सचिन गोरे, रवी आल्हाट, पांडुरंग हिलाळ, डाँ.रांधवन, पै.नामदेव रोहोकले, दीपक रोहोकले, रोहिदास घावटे, किलास माळी, विलास कोरडे, नेहाल काळे, किरण सोनवणे, बाबू महांडुळे, जालिंदर केदार, किरण ठुबे, रामा तराळ, संदीप औटी आदी उपस्थित होते.आभार रमेश माळी यांनी मानले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.