साईसंस्थानच्या निष्क्रीय कारभाराच्या विरोधात जनआक्रोश आंदोलन करणार डॉ.सुजय विखे.अहमदनगर लाईव्ह24.कॉम :साईसमाधी शताब्दी वर्षात शिर्डीचा विकास व साईबाबांचा प्रचार,प्रसार करण्यात अपयशी ठरलेल्या साईसंस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या निष्क्रीय कारभाराच्या विरोधात शिर्डी व पंचक्रोशीतील नागरिकांसह राज्याचे विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा संघटनेच्या माध्यमातुन १५ दिवसात भव्य जनआक्रोश आंदोलन उभारण्यात येणार असल्याची माहीती डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

पंधरा दिवसापुर्वी शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते, साईनिर्माणचे अध्यक्ष विजयराव कोते यांनी विखे पाटील नेतृत्वाखाली साईसंस्थानच्या विरोधात आंदोलन करण्याचे जाहीर केले होते.त्या पार्श्वभुमिवर डॉ. विखे यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची मते जाणुन घेतली. 

डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले की,साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचा गेल्या दोन वर्षापासुन चालु असलेला कारभार अत्यंत निष्क्रीय आहे. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सयंमी भुमिकेमुळे शिर्डी ग्रामस्थ शांत होते,मात्र आता सहनशिलता संपली आहे. साईसमाधी शताब्दी वर्ष सुरु होऊन आठ महिन्यांचा कालावधी लोटला मात्र शिर्डीत कोणतेही ठोस विकासकाम विश्वस्त मंडळ करु शकले नाही,ही शोकांकीता आहे. 

या वर्षात शहराचा विकास व साईबाबांचा प्रचार-प्रसार करण्यात या विश्वस्त मंडळाला अपयश आले आहे. निद्रावस्थेत असलेल्या विश्वस्त मंडळास जाब विचारण्यासाठी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या पंधरा दिवसात भव्य जनआक्रोश आंदोलन जनसेवा संघटनेच्या माध्यमातुन उभारण्यात येणार आहे. 

बाहेर निधी देण्याबाबत दुमत नाही पण अगोदर शहराचा विकास होणे महत्वाचे आहे. एका धार्मिक संस्थेस सहा महिन्यात ५६ कोटी रुपये आरटीजीएस होतात मात्र नगरपंचायतचे विकास कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी दिड वर्षाचा कालावधी लागतो. याचे उत्तर दिले गेले पाहीजे. 

शिर्डी नगरपंचायतचे लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांचा वारंवार अपमान केला जातो. नगरपंचायतला सापत्नपणाची वागणुक दिली जाते. शिर्डीच्या विकास कामांसाठी ना. विखे यांना मुख्यमंत्री महोदयांकडे विशेष बैठक लावुन नगरपंचायतची कामे करुन घ्यावी लागली. राष्ट्रपती आले शताब्दीचा ध्वज फडकावुन निघुन गेले. मुख्यमंत्र्यांनी शताब्दीसाठी ३२०० कोटी रुपयांची केलेली घोषणा हवेत विरली. 

नगरपंचायतच्या विकास कामांना निधी देताना सहनशिलतेचा अंत पाहीला. आतापर्यंत संयम ठेवुन शांततेच्या मार्गाने विश्वस्त मंडळाल काम करुन दिले मात्र आता सहनशिलता संपली आहे. विकास केवळ कागदावर नको प्रत्यक्ष कृती हवी आहे. निद्रावस्थेत असलेल्या विश्वस्त मंडळास जाग आणण्यासाठी हे आंदोलन उभारण्यात येणार आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.