मंत्री प्रा.राम शिंदेंचे कार्य पहावत नसल्यानेच त्या कार्यक्रमात गोंधळ !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात विघ्नसंतोषी लोकांनी जयंतीनिमित्त एकत्रित होत असलेली समाजाची ताकद विस्कळीत करण्यासाठीच मुद्दाम गोंधळ केला. असा आरोप उत्सव समितीच्यावतीने शांतीलाल कोपनर यांच्यासह इतरांनी पत्रकाव्दारे केला आहे. 

अहिल्यादेवींच्या जयंती महोत्सव निमित्त सर्व जाती धर्माचे लोकांचा ओघ वाढत आहे. यावर्षी लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्राताई महाजन आल्या होत्या. अहिल्यादेवींची कर्मभूमी असलेल्या इंदूर येथील गेली ३० ते ३५ वर्षापासून त्या लोकसभा क्षेत्राच्या प्रतिनिधित्व करत आहेत.

कार्यक्रमासाठी लाखो समाजबांधव जमलेले असताना, काही विघ्नसंतोषी विचाराच्या लोकांनी या सोहळ्यात गोंधळ घालून, जयंती उत्सव उधळून लावण्याचा कट रचला. अहिल्यादेवीचे वंशज असलेले व चोंडी कार्यक्षेत्राचे लोकप्रतिनिधी ना. प्रा.राम शिंदे हे राज्य मंत्रीमंडळात महत्वाची जबाबदारी सांभाळत चांगला कारभार करत आहेत. 

मात्र त्याचा व्यवस्थित चाललेला कारभार पाहवत नसलेल्या व एकत्र होत असलेल्या समाजाची ताकद विस्कळीत करण्यासाठी जयंती उत्सवात गोंधळ करणे, पोलिसांना मारहाण करणे, महिलांना भयभीत करणे यातून प्रवृत्ती दाखवून दिली आहे. 

अशा या तेढ निर्माण करणाऱ्या मंडळीचाअहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असल्याचे पत्रक प्रसिध्द केले आहे. यावर शांतीलाल कोपनर, धनराज कोपनर, अंगद रुपनर, भारत मासाळ,विजय पावणे, डॉ. सुरेश भिसे, देविदास कोपनर, झुंंबर भिसे आदीच्या सह्या आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.