जामखेड मधील ते कलाकेंद्र होणार बंद,कलाकेंद्र चालकांचे चांगलेच धाबे दणाणले !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मोहा गावाच्या हद्दीतील कला केंद्रामुळे अवैध धंदे वाढले असल्याने, ती कलाकेंद्रे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत. या मागणीसाठी शनिवारी घेतलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी मोहा गाव कलाकेंद्र मुक्त करण्यात यावे. यासाठी हात वर करून पाठिंबा दिला सर्व ग्रामस्थांनी व महिलांनी एकमुखी पाठिंबा दिला आहे. यामुळे कलाकेंद्र चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.


File Photo

शनिवारी दि.२६ मे रोजीच्या ग्रामसभेत नवीन कला केंद्राच्या परवानगीमुळे चांगलाच गदारोळ झाला होता. त्यामुळे कोणताच तोडगा निघाला नाही. परिणामी पुन्हा मोहा येथील ग्रामसभा ही आज शनिवार दि.२ जून रोजी घेण्याचे ठरले होते. त्या अनुशंगाने आज ही ग्रामसभा आयोजित केली होती. 

पाचही कलाकेंद्र बंद करण्यासाठी ग्रामसभेत ग्रामस्थांनी एकमुखी ठराव पारीत केला. या वेळी ग्रामसेविका पी.एस बुधवंत म्हणाल्या, ग्रामसभेत घेण्यात आलेल्या सर्व कलाकेंद्र बंद करण्याचा ठराव वरीष्ठांना पाठवण्यात येईल. या नंतर ग्रामस्थांना उत्तर देताना ग्रामविस्तार अधिकारी माने यांनी ग्रामसभेचा ठरावाचा अहवाल वरीष्ठांना पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.