श्रीगोंद्यात जुगार अड्ड्यावर छापा,२२ जणांसह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलू येथे सुरू असलेल्या जंबो जुगार अड्ड्यावर शनिवार दि.२ रोजी दुपारी चार वाजता श्रीगोंदा पोलीस पथकाने छापा टाकून जुगार खेळणाऱ्या २२ जणांसह १,६६,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू असणाऱ्या या जम्बो जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईची सर्वत्र चर्चा रंगली.

याबाबत माहिती अशी की, आज दुपारी श्रीगोंदा पोलिस निरीक्षक पोवार यांना श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलूयेथील हॉटेल सनलाईटच्या मागच्या बाजूला पत्र्याच्या शेडच्या आडोशाला अनेक लोक जुगार खेळत असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. 

त्यानुसार पो.नि.पोवार यांनी तातडीने पंधरा पोलिसांचे पथक तयार करून सदर ठिकाणी पाठवले. हे पथक त्याठिकाणी गेले असता त्याठिकाणी वीस ते बावीसजण जुगार खेळत असल्याचे त्यांना आढळून आले. त्यामुळे त्यांनी या जुगार खेळणाऱ्यांना चारही बाजूने वेढा टाकला. काहीजण पोलिसांना पाहून पळून जाण्याचा तयारीत होते. परंतु पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांना पकडले.

यावेळी जुगार खेळणाऱ्या बावीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याकडून २५,७००रूपये रोख, दोन दुचाकी,१९ मोबाईल यासह ऐकून १,६६,५००रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. जुगार खेळणाऱ्या बावीस जणांना श्रीगोंदा पोलिसांनी ताब्यात घेतले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.