आरोपी नगरसेवक विशाल कोतकरचा 'नार्को' टेस्ट घेण्यास नकार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-केडगाव येथे झालेल्या दोघा शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटकेत असलेले व सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी नगरसेवक विशाल कोतकर याने 'नार्को' टेस्ट घेण्यास नकार दिला आहे. 

केडगाव मध्ये सात एप्रिल रोजी झालेल्या हत्येतील मयत संजय कोतकर यांचा मुलगा संग्राम संजय कोतकर याने दिलेल्या फिर्यादीवरुन कोतवाली पोलिस ठाण्यात कट करणे, खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात पोलिसांनी आ. संग्राम जगताप, संदीप गुंजाळ, नगरसेवक विशाल कोतकर, बाळासाहेब कोतकर, संदीप गिऱ्हे, महावीर मोकळे, रवि खोल्लम, भानुदास उर्फ बी. एम. कोतकर, बाबासाहेब केदार आणि भानुदास कोतकर यांना अटक केली. 

सदर आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या गुन्ह्यातील आरोपी संदीप गुंजाळ व नगरसेवक विशाल कोतकर यांची नार्को टेस्ट करण्याबाबत पोलिसांनी न्यायालयात अर्ज सादर केला होता. त्या अर्जावर नगरसेवक विशाल कोतकर याने नाशिक रोड कारागृहातून लेखी म्हणणे न्यायालयात सादर केले असून त्याने 'नार्को' टेस्ट घेण्यास नकार दिला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.