लग्नात नाचू न दिल्याने नवरदेवासह पुतण्यास मारहाण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-आम्हाला लग्नात नाचायचे होते, तु बॅन्जो का बंद केला? असे म्हणून नवरदेव व त्याच्या पुतण्यास लाथाबुक्क्याने व लाकडी दांडक्याने मारहाण करत जखमी केल्याची घटना बुधवार (दि. ३०) रोजी नगर तालुक्यातील शेंडी-पोखर्डी शिवारातील मंदिराजवळ घडली असून या प्रकरणी नऊ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शेंडी-पोखर्डीतील एका मंगल कार्यालयात रविवार दि. २७ रोजी अनुग्रह सोना देठे यांचा लग्नसोहळा पार पडला. यावेळी मिरवणूकीत बॅन्जो लावण्यात आला होता. गाणे लावण्याच्या कारणाहून यावेळी नाचणाऱ्या काही जणांनी वाद घातला.

यावेळी बॅन्जो बंद करत मिरवणूक पुढे नेण्यात आली. याचा राग आल्याने काही जणांनी पुन्हा वाद घातला. हा वाद त्यानंतर सामोपचाराने मिटलाही. मात्र त्यानंतर ९ जणांनी बुधवार दि. ३० मे रोजी एकत्र येत देठे यांच्या पुतण्यास आम्हाला लग्नात नाचायचे होते, तु बॅन्जो का बंद केला असे म्हणून लाथाबुक्क्याने मारहाण केली.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.